
पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर संपुष्टात आला. कुलदीप यादवने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा निम्मा संघ बाद केला. 15 षटकात 72 धावा देत 5 गडी बाद केले. यासह कुलदीप यादवने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 50 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. कसोटीत चौथ्यांदा पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला. तसेच विकेट्सचं अर्धशतकही पूर्ण केलं आहे.

कुलदीप यादवने 1871 व्या चेंडूवर 50 वी विकेट घेतली. यापूर्वी अक्षर पटेलने 2205 व्या चेंडूवर, तर बुमराहने 2465 व्या चेंडूवर 50 वी विकेट घेतली होती. कुलदीप यादवने 2017 मध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं.

कुलदीप यादव मागच्या 100 वर्षात कमी चेंडूवर 50 गडी बाद करणार गोलंदाज ठरला आहे. तसेच तिन्ही फॉर्मेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज आहे.

कुलदीपने कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या 12 कसोटी सामन्यांमध्ये 50 बळी पूर्ण केले. भारतासाठी सर्वात जलद वेळेत 50 कसोटी बळी पूर्ण करणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो संयुक्त पाचवा ठरला आहे.

भारतासाठी कसोटीत सर्वात वेगवान 50 विकेट्स पूर्ण करणारा आर अश्विनने अवघ्या 9 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. अनिल कुंबळेने 10 कसोटी सामन्यात 50 बळी घेतले आहेत. नरेंद्र हिरवानी, हरभजन सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी 11 कसोटी सामन्यांमध्ये 50 बळी पूर्ण केले आहेत.