
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा सलामीला येत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देतो. आतापर्यंत असंच चित्र पाहिलं गेलं आहे. त्यामुळे मधल्या फळीच्या फलंदाजांवरील दबाव कमी होतो. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही अशीच खेळी रोहित शर्मा याने केली आहे.

रोहित शर्मा याने तीन षटकार ठोकताच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला आहे. रोहित शर्मा याने आतापर्यंत एकूण 20 षटकार मारले आहेत. डेविड वॉर्नरला मागे टाकलं.

डेविड वॉर्नर याने आतापर्यंत वर्ल्डकपमधये 19 षटकार मारले आहेत. डेविड वॉर्नरने 6 सामन्यात ही कामगिरी केली आहे. तर रोहित शर्माने 6 सामन्यातच हा रेकॉर्ड ओव्हरटेक केला आहे.

रोहित शर्माने अर्धशतकी खेळी पूर्ण करताच विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने 12व्यांदा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहली, शाकिब अल हसन आणि कुमार संगकारा यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 44 डावात 21 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 12, विराट कोहली 12, शाकिब अल हसन 12 आणि कुमार संगकारा 12 अशी यादी आहे.

कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध 48 धावा करताच हा विक्रम नोंदवला आहे. भारताकडून राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांनी 18 हजार धावा केल्या आहेत.