
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा जेम्स एंडरसन याच्या नावावर आहे. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसन याने टीम इंडिया विरुद्ध 35 सामन्यांमध्ये 139 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियाचे माजी स्पिनर भागवत चंद्रशेखर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. भागवत यांनी इंग्लंड विरुद्ध 23 कसोटीत 95 विकेट्स घेतल्या आहेत.

अनिल कुंबळे यांनी इंडिया-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाची विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळेने इंग्लंड विरुद्ध 19 सामन्यांमध्ये 92 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियाचा आर अश्विन चौथ्या स्थानी आहे. अश्विनने 19 कसोटी सामन्यांमध्ये 88 विकेट्स घेतल्या आहेत.

तर पाचव्या स्थानी टीम इंडियाचे माजी फिरकीपटू बिशन सिंह बेदी आहेत. बेदी यांनी 22 कसोटींमध्ये इंग्लंडच्या 85 विकेट्स घेतल्या.