AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA ODI : क्विंटन डीकॉकची शतकी खेळी, एकाच वेळी तीन दिग्गजांना टाकलं मागे

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना विशाखापट्टणममध्ये होत आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून क्विंटन डीकॉकने शतकी खेळी केली. यासह त्याने तीन दिग्गजांना मागे टाकलं आहे.

| Updated on: Dec 06, 2025 | 5:29 PM
Share
तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने एकदाची नाणेफेक जिंकली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला फलंदाजीला यावं लागलं. या सामन्यात दक्षिण अफ्रिने 47.5 षटकात 10 गडी गमवून 270 धावा केल्या आणि विजयासाठी 271 धावांचं योगदान दिलं. यात क्विंटन डीकॉकची खेळी महत्त्वाची ठरली.  (फोटो- Proteas Men X)

1 / 5
क्विंटन डी कॉकने नुकतीच आंतरराष्ट्रीयमध्ये घेतलेली निवृत्ती मागे घेतली. यानंतर पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकलं. त्यानंतर आता क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध शतकी खेळी केली आहे. क्विंटन डी कॉकने 80 चेंडूत शतक पूर्ण केलं. तर 89 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकार मारत 106 करून बाद झाला. (फोटो- Proteas Men X)

2 / 5
क्विंटन डीकॉकने आक्रमक फलंदाजी केली. वनडे क्रिकेटमधील त्याचे 23 वे शतक झळकावले. क्विंटन डी कॉकने फक्त 42 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर आणखी आक्रमक झाला. पुढील 50 धावा करण्यासाठी त्याने फक्त 38 चेंडू घेतले. यासह त्याने सौरव गांगुलीसह तीन दिग्गजांना मागे टाकले. (फोटो- Proteas Men X)

3 / 5
23 व्या शतकासह सर्वाधिक वनडे शतकांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशाखापट्टणममध्ये शतक झळकावून डी कॉकने सौरव गांगुली, डेव्हिड वॉर्नर आणि तिलकरत्ने दिलशान सारख्या दिग्गजांना मागे टाकले.  या तिघांच्या नावावर 22 शतके आहेत. (फोटो- Proteas Men X)

4 / 5
डी कॉकने 1413  दिवसांच्या दीर्घ कालावधीनंतर भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. यापूर्वी 23 जानेवारी 2022 रोजी शतक ठोकले होते. डी कॉकचे भारताविरुद्धचे हे सातवे शतक आहे. यासह त्याने दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. डी व्हिलियर्सच्या नावावर सहा शतकं आहेत. (फोटो- Proteas Men X)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...