
भारतीय संघाचा जादूगार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांचा वेस्ट इंडिजच्या लेगमध्ये प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. कुलदीपने आतापर्यंत खेळलेल्या केवळ 4 सामन्यांत 10 विकेट घेतले आहेत. उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडविरुद्ध ३ विकेट घेतले होते. यादव आफ्रिकेच्या विरुद्ध चांगली खेळी करु शकतो.

भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने या विश्वचषकात भारतासाठी काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत. या विश्वचषकात त्याने 7 सामन्यात 196 धावा केल्या आहेत. तो आफ्रिकेविरुद्ध मोठी खेळी खेळू शकतो.

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सध्या बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली कामगिरी करत आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ३ विकेट घेत निर्णायक भूमिका बजावली. शेवटी फलंदाजीला आल्यावर त्याने षटकारही मारला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. अक्षरकडून दक्षिण आफ्रिके विरुद्ध चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट चांगलीच चालत आहे. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. त्याने 7 सामन्यात 248 धावा केल्या आहेत. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ आणि इंग्लंडविरुद्ध ५७ धावा केल्या होत्या. अंतिम फेरीत तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या फलंदाजीने आफ्रिकेविरुद्ध चांगली खेळी करु शकतो.