
टीम डिसेंबर महिन्यात साऊथ आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.

टीम इंडियाचा विराट कोहली या दौऱ्यातील पहिल्या 2 मालिकांमध्ये अर्थात टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, विराटने वर्ल्ड कपनंतर विश्रांती हवी असल्याचं सांगितलंय.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, मला विश्रांती पाहिजे असल्याचं विराटने बीसीसीआय आणि निवड समितीला कळवलं आहे.

विराट कसोटी मालिका खेळणार असल्याचंही म्हटलं जात आहे. उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 26 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची 30 नोव्हेंबर रोजी घोषणा होणार आहे. आता निवड समिती कोणला संधी देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.