
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.रोहितने या सामन्यात 4 वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज मैदानात उतरवले. या सामन्यातून वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने वनडे पदार्पण केले.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना पूर्णपणे गोलंदाजांच्या नावावर होता. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या 114 धावांत आटोपला.

फिरकीपटू कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून सात गडी बाद केले. कुलदीपने तीन षटकात 6 धावा देऊन 4 बळी घेतले. जडेजाने 6 षटकांत 37 धावा देत 3 गडी बाद केले. हार्दिक पांड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

विंडीज संघाने एक नाही तर अनेक लाजिरवाणे विक्रम नोंदवले. घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये पाकिस्तानने 98 धावांत गुंडाळले होते.

वेस्ट इंडिजने फक्त 23 षटके खेळली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी सर्वात कमी षटके आहेत. बांगलादेशने 2011 साली चितगाव येथे 22 षटकांत ऑलआऊट केलं होतं.

एकदिवसीय क्रिकेटमधील भारताविरुद्धची ही वेस्ट इंडिजची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. 2018 साली तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा संघ 104 धावांत ऑलआऊट झाला होता.