
झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्या भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात फेल ठरलेल्या अभिषेक शर्माने सर्व कसर दुसऱ्या सामन्यात भरून काढली.

अभिषेक शर्मा पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातच खराब झाली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने 47 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 217.39 चा होता.

अभिषेक शर्माने या सामन्यात 8 षटकार मारून हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकलं आहे. रोहित शर्माने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत एकूण 47 सिक्स मारले आहेत. तर अभिषेकच्या नावार 50 षटकार झाले आहेत. अभिषेकने आयपीएलमध्ये 42 सिक्स मारले होते.

अभिषेक शर्माने अर्धशतक 33 चेंडूत केलं. त्यानंतरच्या 50 धावा या 13 चेंडूत केल्या. त्याने षटकार मारून अर्धशतक पूर्ण केलं तेव्हा 53 धावा झाल्या होत्या. पुढच्या 13 चेंडूत त्याने 4,6,4,2,1,1,6,4,1,0,6,6,6 अशी फटकेबाजी केली.

अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी टीम इंडियाकडून टी20 क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 137 धावांची भागीदारी केली. भारताकडून ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. (सर्व फोटो- ट्वीटर)