
पहलगाम अतिरेकी हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदुर मोहीम हाती घेत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर भारत पाकिस्तान क्रीडा मैदानात आमनेसामने आले होते. भारताने पाकिस्तानला चितपट करत स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकली. (File Photo: Getty Images)

मलेशियात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आशियाई स्क्वॉश दुहेरी चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील तिन्ही प्रकारात भारताने जेतेपद मिळवलं. या स्पर्धेत पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशी स्पर्धा रंगली होती. (File Photo: Getty Images)

या स्पर्धेत सर्वात महत्त्वाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होता. पुरूष दुहेरी सामन्यात दोन्ही प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. यात अभय सिंह आणि वेलावन सेंथिलकुमार या जोडीने पाकिस्तानच्या नूर जमाना आणि नासिर इकबाल या जोडीला 2-1 (9-11, 11-5,11-5) ने पराभूत केलं. पहिल्या फेरीत पाकिस्तानने सरशी घेतली होती. त्यानंतर भारताने जोरदार कमबॅक करत पराभवाची धूळ चारली. (File Photo: Getty Images)

महिला दुहेरीत भारताच्या जोशना चिनप्पा आणि अनाहत सिंह या जोडीने जेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यात यजमान मलेशियाच्या आयना अमानी आणि शिन यिंग या जोडीला 2-1 मात दिली. हा 8-11, 11-9, 11-10 असा झाला. शेवटचा सेट अतितटीचा झाला आणि भारताने बाजी मारली. (File Photo: Getty Images)

मिश्र दुहेरीतही भारताने बाजी मारली. भारताने मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या जोडीला पराभवाचं पाणी पाजलं. अनाहत आणि अभय ही जोडी मिश्र दुहेरीत भारताकडून मैदानात होती. तर मलेशियाकडून रेचल अरनॉल्ड आणि अमीशेनराज चंद्रन खेळत होती. भारताने हा सामना सरळ सेटमध्ये जिंकला. 11-9, 11-7 ने पराभूत केलं. (File Photo: Getty Images)