
एकीकडे भारतीय पुरुष संघ आगामी टी 20 चषकाची तयारी करत असताना महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियन महिला संघाला मात देण्यासाठी तयार झाला आहे. भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिलांमध्ये क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले असून 21 सप्टेंबरपासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे.

या दौऱ्यात तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. सर्व भारतीय महिला मैदानात सराव करत असून ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला मात देण्यासाठी रणनीती आखत आहेत.

या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 21, 24 आणि 26 सप्टेंबर रोजी एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

एकदिवसीय सामन्यांनंतर 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. बऱ्याच वर्षानंतर भारतीय महिला ऑस्ट्रेलियासंघाविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहेत.

कसोटी सामना झाल्यानंतर 7, 9 आणि10 ऑक्टोबर या तीन दिवस तीन टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा सर्व मजामस्ती असणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौैऱ्यासाठी क्रिकेटरसिकही उत्सुक झाले आहेत.