
आशिया कप 2023 स्पर्धेच्या जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. भारताने आठव्यांदा ही कामगिरी केली आहे. आतापर्यंत झालेल्या 16 स्पर्धांमध्ये भारताने 8, श्रीलंकेने 6 आणि पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

1984 मध्ये युएईमध्ये झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत पहिल्यांदा आशिया कप जिंकला.

आशिया कप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं. 1988 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

1990-91 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

1995 मध्ये भारताने सलग तिसऱ्यांदा श्रीलंकन संघाचा पराभव करत विजय मिळवला. या विजयासह हॅटट्रीक साधली.

15 वर्षांचा दीर्घ कालावधीनंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. 2010 ही स्पर्धा पार पडली होती.

2016 मध्ये भारताने बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला. यासह सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

2018 मध्ये पु्न्हा एकदा भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सातव्यांदा जेतेपद मिळवलं.

आशिया कप 2023 स्पर्धेत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. यासह जेतेपदावर आठव्यांदा नाव कोरलं. या विजयाचा शिल्पकार मोहम्मद सिराज ठरला.