IND W vs ENG W: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात शफाली वर्माचा नकोसा विक्रम, 20 वर्षानंतर असं घडलं
भारताने नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी आली. पण भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. स्टार फलंदाज शफाली वर्मा खातंही खोलू शकली नाही. तिने 4 चेंडूंचा सामना केला आणि तंबूत परतली.

क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर इतिहास रचला गेला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना होत आहे. या मैदानावर पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळला जात आहे. असं असताना या ऐतिहासिक सामन्यात भारतीय महिला संघाची सुरूवात निराशाजनक राहिली. (PHOTO CREDIT- PTI)

नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं गेलं. पण संघाच्या अवघ्या 4 धावा असताना टिम इंडियाची पहिली विकेट गेली. टिम इंडियाची स्टार फलंदाज शफाली वर्मा खातं न खोलता तंबूत परतली. तिने चार चेंडूंचा सामना केला आणि तिला एकही धाव काढता आली नाही. (PHOTO CREDIT- PTI)

ऐतिहासिक सामन्यात खातं न खोलता बाद झाल्याने शफाली वर्माच्या नावावर कसोटीत एक नकोसा विक्रम रचला गेला आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात 20 वर्षानंतर असा प्रकार घडला आहे. सलामीचा फलंदाज खातं न खोलता बाद झाला. (PHOTO CREDIT- PTI)

शफाली वर्मा भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात पाचवी शून्यावर बाद होणारी फलंदाज ठरली आहे. यापूर्वी 2006 मध्ये मोनिका सुमरा इंग्लंडविरुद्ध लेस्टरमध्ये शून्यावर बाद झाली होती. (PHOTO CREDIT- PTI)

शफाली वर्माने क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत सात कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 13 डावात 607 धावा केल्या आहेत. या दरम्यान तिने तीन अर्धशतकं आणि एक शतक ठोकलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)