
गुजरात टायटन्सने 13 सामन्यापैकी 9 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. गुजरातच्या खात्यात 18 गुण असून अव्वल स्थानी आहे. (Photo - IPL)

गुजरात टायटन्सचा शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत 21 मे 2023 रोजी आहे. हा सामना जिंकला तर गुजरातचे 20 गुण होतील. हा सामना गमावला तरी गुजरात 18 गुणांसह अव्वल स्थानी असणार आहे. (Photo - IPL)

गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असलेल्या संघांना प्लेऑफमध्ये दोन संधी मिळतात. गुजरातचा पहिला सामना 23 मे रोजी असणार आहे. पण कोणत्या संघासोबत असेल हे निश्चित नाही. (Photo - IPL)

गुजरातने 23 मे 2023 चा सामना गमवला तर एक आणखी संधी मिळणार आहे. 24 मे रोजी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामना होईल. या सामन्यात विजयी संघासोबत 26 मे रोजी अंतिम फेरीसाठी एक संधी मिळेल. (Photo - IPL)

आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना 28 मे 2023 रोजी असणार आहे. (Photo - IPL)