
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला आहे.

हा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवला तरच आरसीबीला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल. सामना झाला नाही तर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.

बंगळुरूमध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार होता. पण पासाच्या व्यत्ययामुळे 8.30 वाजता हा सामना सुरु झाला आहे. आता सामना 20 षटकांचा होणार आहे. पण सामन्यात पावसाने हजेरी लावली. तर षटकं कमी जाईल.

प्रत्येक आठ मिनिटांसाठी एक षटक कमी केलं जाईल. त्यात वेळेचं गणित महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे षटकं कमी करून सामना पूर्ण केला जाऊ शकतो. सामना सुरू झाल्यानंतर पाऊस पडल्यास डकवर्थ लुईस नियमानुसार षटक कमी करून लक्ष्य दिले जाईल.

सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी किमान पाच षटकं खेळणं गरजेचं आहे. पहिल्या डावात बंगळुरुने 10 षटके खेळल्यास, दुसऱ्या डावात गुजरातने 5 षटके पूर्ण केली पाहिजेत. तरच डकवर्थ लुईस नियम लागू होईल. त्यामुळे संघाचा विजय निश्चित करण्यासाठी किमान 5 षटकांचा सामना खेळणं गरजेचं आहे.