
IPL 2023 RCB vs GT: दिनेश कार्तिकने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध शून्यावर आऊट होऊन नकोसा विक्रम नावावर केला आहे.

या सामन्यात पाचव्या क्रमांकावर आलेल्या दिनेश कार्तिकने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट दिली. गोल्डन डकसह दिनेश कार्तिकने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे.

आयपीएल 2023 स्पर्धेत दिनेश कार्तिक चौथ्यांदा शून्यावर बाद आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे.

आयपीएल स्पर्धेत 221 डाव खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने17 वेळा शून्यावर बाद झाला आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या आयपीएलच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने 236 डावात एकूण 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स संघाचा खेळाडू सुनील नरेन 96 डावात 15 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

केकेआरचा खेळाडू मनदीप सिंगने 98 डावात 15 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

सीएसके संघाचा फलंदाज अंबाती रायुडू 185 डावात एकूण 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.