
विराट कोहलीने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कोलकाता विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकून एक खास विश्वविक्रम रचला.

विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 5 सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. या सामन्यातही विराटने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

विराट कोहली बाद झाल्यानंतर त्यानंतर आलेला एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला. त्यामुळे संघाचा 21 धावांनी पराभव झाला.

37 चेंडूत 6 चौकारांसह 54 धावा केल्या. या अर्धशतकासह विराट कोहलीने चिन्नास्वामी स्टेडियमवर 3000 धावा पूर्ण केल्या. फक्त टी-२० सामन्यांद्वारेच त्याने ही कामगिरी केली.

विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये एकाच मैदानावर 3000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. आरसीबीच्या होम ग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमवर हा विश्वविक्रम केला.