
विराट कोहलीने मोहालीमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. (Photo : BCCI/IPL)

विराट कोहलीने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली, तर फाफने 56 चेंडूत 84 धावा केल्या. बंगळुरूने 20 षटकात 4 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं. (Photo : BCCI/IPL)

47 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 59 धावा करणाऱ्या विराट कोहलीने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. (Photo : BCCI/IPL)

वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर होता. गेलने 463 टी-20 डावांमध्ये 88 अर्धशतके झळकावली होती. (Photo : BCCI/IPL)

विराट कोहलीने 366 टी-20 डावात एकूण 89 अर्धशतकं ठोकली आहेत. याद्वारे त्याने ख्रिस गेलला मागे टाकत अर्धशतकांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. (Photo : BCCI/IPL)

या यादीत डेव्हिड वॉर्नर अव्वल आहे. 347 टी-20 डाव खेळणाऱ्या वॉर्नरने एकूण 96 अर्धशतके झळकावली आहेत. आता हा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त 8 अर्धशतकांची गरज आहे. (Photo : BCCI/IPL)