Team India | ज्याला बाहेर काढलं, तोच आता टीमचा संकटमोचक! बीसीसीआय आणि रोहितसेनेला मोठा दिलासा

बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटने ज्या खेळाडूला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला, तोच खेळाडू आता टीम इंडियासाठी तारणहार ठरणार असल्याचं समोर येत आहे. जाणून घ्या.

Sanjay patil | Updated on: May 08, 2023 | 5:37 PM
1 / 5
आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. यंदा टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर 2021 मध्ये टीम इंडियाला विराट कोहली याच्या कॅप्टन्सीत न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला.  आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या महामुकाबल्यासाठी भारतीय संघांचीही घोषणा करण्यात आली आहे.

2 / 5

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याची अपघातामुळे निवड करण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी केएस भरत याला संधी देण्यात आली. तर दुसरा विकेटकीपर म्हणून केएल राहुल याचा पर्याय होता. मात्र आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व करणाऱ्या केएल राहुल याला दुखापत झाली. त्यामुळे केएल एका झटक्यात आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर पडला.

3 / 5

केएल राहुल याच्या जागी टीम इंडियात कुणाला संधी द्यायची याचं उत्तर टीम मॅनेजमेंटला मिळालं आहे. गुजरात टायटन्सच्या ऋद्धीमान साहा याने 7 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध तडाखेदार खेळी करत केएलच्या जागेसाठी दावेदारी ठोकली.

4 / 5

साहाला आधी तिन्ही फॉर्मेटमधून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात आलं. मात्र साहाने आयपीएलच्या या 16 व्या मोसमात आतापर्यंत झंझावाती खेळी केलीय.

5 / 5

ऋद्धीमानने लखनऊ विरुद्ध 43 बॉलमध्ये 10 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. तसेच शुबमन गिलसोबत 142 धावांची सलामी भागीदारीही केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us