
चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी ओपनर विकेटकीपर बॅट्समन डेव्हॉन कॉन्वहे याच्या अंगठ्याला दुखापत झालीय. त्यामुळे त्याच्या जागी ओपनिंग कोण करणार असा प्रश्न आहे. मात्र सीएसकेकडे 3 पर्याय आहेत. धोनी अंजिक्य रहाणे, डॅरेल मिचेल आणि रचिन रवींद्र या तिघांपैकी कुणा एकाला कॉनव्हेच्या जागी ओपनिंगची संधी देऊ शकतो.

भारतीय वंशाचा रचीन रवींद्र याने न्यूझीलंडकडून वर्ल्ड कप 2023 मध्ये ओपनिंग केली. रचीन वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्याच्या यादीत पहिल्या पाचात होता. मात्र रवींद्रला बॉलिंगने काही खास करता आलं नाही.

वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरेल मिचेल याने धमाकेदार बॅटिंग केली होती. डॅरेल सीएसकेसाठी निर्णायक भूमिका बजावू शकतो. आता धोनी पहिल्याच सामन्यात कुणाला संधी देतो, याकडे लक्ष असेल.

श्रीलंकेचा बॉलर मथीशा पथिराणा याने गेल्या हंगामात महेंद्रसिंह धोनी याचा विश्वास खरा ठरवत उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र तो हॅमस्ट्रिंगच्या जाळयात फसला. त्यामुळे धोनी शार्दूल ठाकुर किंवा तुषार देशपांडे या दोघांवर विश्वास टाकू शकतो.

सीएसकेने बांगलादेशचा बॉलर मुस्तफिजुर याला 2 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतला. मात्र मुस्तफिजुर याला बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत सरावादरम्यान डोक्याला बॉल लागला. त्यामुळे बॉलिंगची जबाबदारी दीपक चाहर याला घ्यावी लागू शकते.