
आयपीएल स्पर्धा २२ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आनंदाची बातमी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा उदयोन्मुख फलंदाज जेकब बेथेल दुखापतग्रस्त झाला होता. पण आरसीबीकडून खेळण्यास सज्ज आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेदरम्यान बेथेलला दुखापत झाली होती. यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड संघाचा भाग नव्हता. तर आयपीएलपूर्वी बेथेल पुन्हा बरा होईल का? की नाही याची चाहत्यांना चिंता होती.

आयपीएल मेगा लिलावात जेकब बेथेलला खरेदी करण्यासाठी आरसीबीने मोठा डाव लावला होता. २.६ कोटी रुपये खर्च केले होते. पण बेथेलने भारताविरूद्धच्या मालिकेत फार काही चांगली कामगिरी केली नव्हती.

भारतात झालेल्या टी२० मालिकेत तीन सामने खेळणाऱ्या जेकब बेथेलने ७.६६ च्या सरासरीने आणि ७६ च्या स्ट्राईक रेटने फक्त २३ धावा केल्या. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात बेथेलने ५१ धावांची दमदार खेळी केली होती.

बेथेलला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. त्याच दुखापतीमुळे बेथेल २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड संघाचा भाग नव्हता. (फोटो- टीव्ही 9 कन्नड)