IPL 2026 Fair Play Award: पंजाबने पटकावला फेअर प्ले अवॉर्ड, चॅम्पियन आरसीबीचा कितवा नंबर?

IPL 2026 Fair Play Award : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुजरात टायटन्सला पराभूत करुन आयपीएल 2026 ची विजेता टीम ठरली. मात्र पंजाब किंग्स टीमने फेअर प्ले अवॉर्ड पटकावला. जाणून घ्या या यादीत सर्वात शेवटच्या स्थानी कोणती टीम आहे.

| Updated on: Jun 01, 2026 | 5:05 PM
1 / 6
पंजाब किंग्स आयपीएल स्पर्धच्या 19 व्या मोसमात पहिल्या 7 पैकी 6 सामने जिंकून अजिंक्य राहीली. मात्र त्यानंतरही पंजाब प्लेऑफचं तिकीट मिळवण्यात अपयशी ठरली. मात्र पंजाबने या हंगामात फेअर प्ले अवॉर्ड पटकावला आहे. पंजाबने 14 सामने खेळले. पंजाबने प्रत्येक सामन्यात 10 पैकी 10 गुणांची कमाई केली. (Photo Credit : PTI)

2 / 6
पंजाब किंग्सला टीमला फेअर प्ले ट्रॉफी आणि 10 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. टीम आणि खेळाडू मैदानात प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध कसे वागतात? पंचांसह त्यांची वागणूक कशी असते? खेळाडू नियमांची अंमलबजावणी करतात की नाही? याआधारे गुण दिले जातात. तसेच अंतिम सामन्यानंतर सर्वोत्तम ठरलेल्या संघाला फेअर प्ले अवॉर्डने गौरवण्यात येतं. (Photo Credit : PTI)

3 / 6
उपविजेता गुजरात टायटन्सला इथेही दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. गुजरातने 17 सामने खेळले. गुजरातच्या खात्यात. 9.94 इतके पॉइंट्स राहिले. कॅप्टन शुबमन गिल आक्रमक झाल्याने गुजरातला काही प्रमाणात फटका बसला.  (Photo Credit : PTI)

4 / 6
आयपीएल 2026 चॅम्पियन आरसीबी या यादीत नवव्या स्थानी राहिली. आरसीबीला प्रत्येक सामन्यानंतर 9.38 असे पॉइंट्स मिळाले. खेळाडूंचा आक्रमकपणा टीमला या पुरस्कारापासून दूर नेत जातो. (Photo Credit : PTI)

5 / 6
दिल्ली कॅपिट्ल्स टीमची 19 व्या मोसमात मैदानात सर्वात वाईट वागणूक राहिली. अपवाद वगळता दिल्लीच्या खेळाडूंना बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर काही खास करता आलं नाही. (Photo Credit : PTI)

6 / 6
फेअर प्ले अवॉर्डच्या यादीत कोणता संघ कोणत्या स्थानी राहिला हे जाणून घेऊयात : दिल्ली : 10, आरसीबी : 9, मुंबई : 8, एसआरएच : 7, राजस्थान : 6, एलएसजी : 5, केकेआर : 4, सीएसके : 3,  जीटी : 2 आणि पंजाब : 1. (Photo Credit : PTI)

Follow Us