IPL 2026 : आतापर्यंत सर्वाधिक षटकार लगावणारे 5 फलंदाज, अनकॅप्ड खेळाडू पहिल्या स्थानी

IPL 2026 Most Sixes : आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या टॉप 5 मध्ये पहिले 2 फलंदाज हे अनकॅप्ड आहेत. या दोन्ही फलंदाजांच्या संघांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.

| Updated on: Apr 10, 2026 | 4:07 PM
1 / 6
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) 9 एप्रिलपर्यंत एकूण 15 सामने खेळवण्यात आले आहेत. प्रत्येक संघाने किमान 2 सामने खेळले आहेत. या 15 सामन्यांपर्यंत सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत. (Photo Credit : PTI)

2 / 6
दिल्ली कॅपिट्ल्सचा अनकॅप्ड आणि युवा खेळाडू  समीर रिझवी सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या पहिल्या स्थानी आहे. समीर रिझवी याने 3 सामन्यांमध्ये 11 षटकारांसह एकूण 160 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 6
राजस्थान रॉयल्सचा अनकॅप्ड आणि युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या पहिल्या स्थानी आहे. वैभव सूर्यवंशी याने 3 सामन्यांमध्ये 11 षटकारांसह 122 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 6
मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज रायन रिकेल्टन संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहे. रायन रिकेल्टन याने 3 सामन्यांमध्ये 9 षटकार लगावले आहेत. तसेच रायनने एकूण 98 धावा केल्या आहेत.  (Photo Credit : PTI)

5 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विस्फोटक फलंदाज टीम डेव्हीड याने 2 सामन्यांत 9 षटकार खेचले आहेत. टीम डेव्हीड याने आरसीबीसाठी या 2 डावांत जबरदस्त कामगिरी करत एकूण 86 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

6 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदार यानेही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रजतने 2 सामन्यांत निर्णायक क्षणी फटकेबाजी करत 9 षटकार लगावले आहेत. आरसीबीच्या या फलंदाजाने 2 सामन्यांत एकूण 79 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

Follow Us