
दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर जॅक कॅलिस हा सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक आहे. तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने कसोटी आणि एकदिवसीय फॉर्मेटमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या. तसेच 250 हून अधिक विकेट्सही घेतल्या.

जॅक कॅलिस 2009 च्या आयपीएल दरम्यान प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याची बहीण जॅनिन कॅलिस चीअरलीडर म्हणून आयपीएलमध्ये भाग घेत असल्याचे समोर आलं.

आयपीएल 2009 दरम्यान जॅनिन कॅलिस चीअरलीडर म्हणून भारतात आली. "मी हे काम छंदासाठी करते. माझ्याबद्दल कोणी काय विचार करते याने काही फरक पडत नाही", असं जॅनिनने एका मुलाखतीत सांगितलं होतं. जॅनिन महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या चीअरलीडिंग ग्रुपचा भाग होती.

जीनी कॅलिस या व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे. ती लंडनमध्ये राहते. तिने आता चीअरलीडिंग सोडले आहे. ती आता विवाहित आहे. ती एका मुलीची आई आहे.

दरम्यान जॅक कॅलिस याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 166 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 55.37 च्या सरासरीने 13 हजार 289 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय कारकिर्दीत त्याने 328 सामने खेळले आहेत. त्यात 44.36 च्या सरासरीने 11 हजार579 धावा केल्या आहेत. कसोटी कारकिर्दीत त्याने 166 सामन्यात 292 विकेट घेतल्या. तसेच वनडेत त्याने 328 मॅचमध्ये 273 विकेट घेतल्या. तसेच T20मध्ये 25 सामन्यात 666 धावा केल्या आणि 12 विकेट्सही घेतल्या आहेत.