IRE vs NZ : टॉम ब्लंडेलची जबरदस्त खेळी, आयर्लंड विरुद्ध 186 धावा, 7 वर्षानंतर अशी कामगिरी
Ireland vs New Zealand Only Test :आयर्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बेलफास्टमधील सिविल क्रिकेट कल्बच्या मैदानात एकमेव कसोटी सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा विकेटकीपर फलंदाज टॉम ब्लडेंल याने पहिल्या डावात सर्वाधिक धावा करण्यासह खास कामगिरी केली.

न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयर्लंड विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 490 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी रचीन रवींद्र आणि टॉम ब्लंडेल या दोघांनी शतकी खेळी केली. (PHOTO CREDIT-GETTY IMAGES)

रचीन रवींद्र याने 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 121 धावा केल्या. तर टॉम ब्लंडेल याने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. टॉमने 186 धावा केल्या. टॉमने यासह न्यूझीलंडसाठी 7 वर्षांनंतर खास कामगिरी केली. (PHOTO CREDIT-GETTY IMAGES)

टॉम न्यूझीलंडसाठी विकेटकीपर म्हणून सर्वोच्च धावसंख्या करणारा दुसरा फलंदाज ठरला. न्यूझीलंडसाठी विकेटकीपर म्हणून एका डावात सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम हा बीजे वॉटलिंग याच्या नावावर आहे. बीजेने 2019 साली 205 धावा केल्या होत्या.(PHOTO CREDIT-GETTY IMAGES)

टॉमने 186 धावा करण्यासाठी 292 चेंडूंचा सामना केला. टॉमला द्विशतक करण्याची संधी होती. मात्र टॉम द्विशतक करण्यात अपयशी ठरला. रियूबेन विलसन याने टॉमला आऊट केलं. (PHOTO CREDIT-GETTY IMAGES)

आयर्लंडची पहिल्या डावात 490 धावांच्या प्रत्युत्तरात घसरगुंडी झाली. न्यूझीलंडने आयर्लंडला 38 धावांवर 6 झटके दिले. त्यामुळे आयर्लंडवर फॉलोऑनची टांगती तलवार आहे.(PHOTO CREDIT-GETTY IMAGES)