Neeraj Chopra: भालाफेकपटू नीरज चोप्रा जवळपास एक वर्षांनी उतरणार मैदानात, या दिवशी खेळणार सामना

Doha Diamond League 2026: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. लवकरच मैदानात उतरणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. डायमंड लीग स्पर्धेत खेळणार असून लवकरच प्रतीक्षा संपणार आहे.

| Updated on: Jun 19, 2026 | 5:17 PM
1 / 5
भारताचा गोल्डन बॉय आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता ठरलेला नीरज चोप्रा गेल्या वर्षभरापासून मैदानापासून दूर होता. आता 2026 च्या एथलेटिक्स पर्वाला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. पाठिच्या दुखापतीमुळे काही आठवडे खेळापासून दूर होता. स्वित्झर्लंडमधील ऑलिम्पिक सेंटरमध्ये पुनर्वसन केल्यानंतर नीरज आता डायमंड लीग स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाला आहे.  (Photo: PTI)

2 / 5
या स्पर्धेच्या सुरुवातीच्या प्रवेश यादीत नीरज यादवचं नाव नसल्याने त्याच्या तब्येतीबाबत संभ्रम होता. पण आता स्पर्धेत खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे. दोहा येथील कतार स्पोर्ट्स क्लब मैदानात नीरज चोप्रा आपली कसब दाखवणार आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चौथ्यांदा भाग घेणार आहे.  (Photo: PTI)

3 / 5
नीरजने 2023 दोहा डायमंड लीग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर 2024 आणि 2025 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला होता. मागच्या वर्षी नीरज चोप्राने 90.323 मीटर लांब भाला फेकून नवा राष्ट्रीय विक्रम रचला होता. त्याने पहिल्यांदाच 90 मीटरचा जादुई आकडा गाठला होता.  (Photo: PTI)

4 / 5
डायमंड लीग स्पर्धेत पुरूषांची भालाफेक स्पर्दा 19 जून रोजी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11 वाजून 14 मिनिटांना स्पर्धेला सुरूवात होईल. भारतीय चाहते डायमंड लीग 2026 स्पर्धेच थेट प्रक्षेपण डायमंड लीगच्या अधिकृत युट्यूब चॅनेल किंवा फेसबुकवर विनामूल्य पाहू शकतात.  (Photo: PTI)

5 / 5
पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीमने या स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. नीरज चोप्राची लढत श्रीलंकेचा उदयोन्मुख खेळाडू रोमेश थरंगा पाथिरागे याच्याशी होईल. पाथिरागने नुकतंच रोम डायमंड लीग स्पर्धेत 92.62 मीटर भालाफेक करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. (Photo: PTI)

Follow Us