Harbhajan Singh : ‘मूर्खपणा बंद कर’, भारताला फेवर केल्याच्या आरोपावर हरभजनच इंग्रजाला रोखठोक उत्तर

Harbhajan Singh : टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने इंग्लंडवर शानदार विजय मिळवला. हे इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंच्या जिव्हारी लागल आहे. ते टीम इंडियाला या विजयाच श्रेय द्यायला तयार नाहीयत. ते पीच, वेन्यू असे मुद्दे उपस्थित करत आहेत. टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने अशाच एका माजी इंग्लिश क्रिकेटपटूला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

| Updated on: Jun 28, 2024 | 12:12 PM
1 / 9
टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल गाठली आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर विजय मिळवला. टीम इंडियाने 68 धावांनी शानदार विजय मिळवला. भारताला या विजयाच श्रेय देण्याऐवजी इंग्लिश क्रिकेटपटू रडगाणं गात आहेत.

2 / 9
वर्ल्ड कपच्या सेमीफायनलसाठी भारताला सोयीच स्टेडियम दिलं असा आरोप इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने केला आहे. भारतीय प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊन व्यावसायिक हित डोळ्यासमोर ठेऊन क्वालिफाय झाले, तर टीम इंडिया दुसरा सेमीफायनल सामना गुयाना येथे खेळणार हे आधीच ठरलेलं होतं, असा आरोप मायकल वॉनने केला.

3 / 9
सेमीफायनलसाठी टीम इंडियाला गुयानातील प्रोव्हायडन्स स्टेडियम देऊन ICC ने अन्य टीम्स बरोबर पक्षपातीपणा केला असा आरोप मायकल वॉनने केला. त्याने X वरुन मनातील खदखद व्यक्त केली.

4 / 9
इंग्लंडला हरवल्याच श्रेय मायकल वॉनने टीम इंडियाला दिलं. पण पीचवरुन रडगाणं सुद्धा सुरु केलं.  "गुयानाच्या धीम्या आणि स्पिनिंग पीचवर टीम इंडियाने उत्तम खेळ केला. इथे इंग्लंडला जिंकण कठीण होतं. स्पिन ट्रॅकवर इंडिया चांगलं खेळते" असं मायकल वॉन म्हणाला.

5 / 9
ब्रायन लारा स्टेडियमवर मॅच झाली असती, तर इंग्लंड जिंकली असती असा मायकल वॉनचा दावा आहे. भारताच्या सोयीच्या दृष्टीने गुयानाला निवडण्यात आलं, असा आरोप मायकल वॉनने केला.

6 / 9
"इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला हरवलं असतं, तर त्यांना त्रिनिदादमध्ये खेळायला मिळालं असतं. तिथे ते सामना जिंकले असते. गुयानाची पीच भारतासाठी अनुकूल होता" असा आरोप मायकल वॉनने केलाय.

7 / 9
टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने अत्यंत कठोर शब्दात मायकल वॉनचा समाचार घेतला आहे. त्याने मायकल वॉनला हा मूर्खपणा बंद करायला सांगितला आहे.

8 / 9
"गुयाना भारतासाठी चांगला वेन्यू होता, असं तुला म्हणायच आहे का?. दोन्ही टीम्स एकाच स्टेडियममध्ये खेळल्या. इंग्लंडने टॉस जिंकला, त्यांच्याकडे ॲडव्हानटेज होता. मूर्खपणा बंद कर"

9 / 9
"भारताने इंग्लंडपेक्षा सर्व आघाड्यांवर सरस खेळ केला. सत्याचा स्वीकार करुन पुढे जा. तुझा मूर्खपणा तुझ्याकडे ठेव. तर्कावर आधारीत बोल, मूर्खपणा नको" अशा शब्दात हरभजन सिंगने मायकल वॉनला सुनावलं.