IPL 2021: जगातील अप्रतिम खेळाडू, केकेआरसाठी मात्र ‘अनलकी’

| Updated on: Sep 26, 2021 | 11:09 PM

आय़पीएलच्या 14 व्या हंगामाला पुन्हा सुरुवात होताच सुरुवातीचे दोन्ही सामने केकेआर संघाने जिंकले. पण त्यानंतर तिसऱ्या सामन्यात चेन्नईने मात्र 2 गडी राखून केकेआरला मात दिली.

1 / 5
आयपीएलच्या (IPL 2021) 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) कोलकाता नाईट रायडर्सना (KKR) दोन विकेट्सने पराभूत केलं. चेन्नईने हा शानदार विजय मिळवला. पण यावेळी थोडक्यात हातातून सामना गमाववा लागल्याने केकेआरचे चाहते कमालीचे नाराज आहेत. तसेच या सर्वासाठी कुठेतरी कर्णधार इयॉन मॉर्गनही (Eoin Morgan) जबाबदार असल्याची प्रतिक्रियाही आता समोर येत आहे. त्यामुळे जगातील अव्वल क्रिकेटपटू केकेआर संघासाठी मात्र खास कामगिरी करत नसल्याचे दिसून येत आहे.

2 / 5
आजच्या सामन्यातही मॉर्गनने 14 चेंडूत केवळ 8 धावाच केल्या. तो आजही मोठा शॉट खेळण्याच्या नादात बाद झाला, जखमी फाफ डुप्लेसीसने त्याचा झेल पकडला.

3 / 5
यंदाच्या आयपीएलमध्ये मॉर्गनने आतापर्यंत 10 सामन्यात 102.88 च्या स्ट्राइक रेटने केवळ107 रन केले आहेत. 47 हाच त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

4 / 5
इंग्लंडला इतिहासात प्रथम विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार म्हणून केकेआरने मॉर्गनला 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 2020 मध्ये दिनेश कार्तिककडून कर्णधारपद हे मॉर्गनला देण्यात आलं होतं.

5 / 5
मॉर्गन हा आयपीएलमध्ये अधिक काळ केकेआरसोबतच आहे. सुरुवातीला केकेआरमध्ये असणारा मॉर्गन 2015 आणि 2016 मध्ये सनरायजर्स हैद्राबाद संघामध्ये होता. 2017 मध्ये पंजाब संघातून खेळल्यानंतर मॉर्गनने 2019 चा विश्वचषक इंग्लंडला जिंकवून देताच. केकेआरने त्याला विकत घेतलं. मॉर्गनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 76 सामन्यात 124.12 च्या स्ट्राइक रेटने 1 हजाकर 379 धावाच केल्या आहेत.  ज्यात केवळ 5 अर्धशतकं समाविष्ट आहेत.