IPL 2022: ना धोनी, ना विराट-रोहित… हा भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार, कारण ऐकून तुम्हीही हसाल

| Updated on: Mar 21, 2022 | 1:04 PM

भारताचा मधल्या फळीतला स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या नावाचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका वाजतोय. श्रेयसने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कारकिर्दीला सुरुवात केली आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्याची कारकीर्द बहरू लागली आहे

1 / 4
भारताचा मधल्या फळीतला स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या नावाचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका वाजतोय. श्रेयसने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कारकिर्दीला सुरुवात केली आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्याची कारकीर्द बहरू लागली आहे. असे असूनही, टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरचा आवडता भारतीय कर्णधार विराट किंवा रोहित नाही. श्रेयसच्या आवडत्या खेळाडूने आतापर्यंत केवळ तीन एकदिवसीय आणि एका कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे आणि विशेष म्हणजे या चारपैकी एकाही सामन्यात भारताला विजय मिळालेला नाही. श्रेयसच्या या आवडत्या कर्णधाराचं नाव आहे केएल राहुल. अलीकडच्या काळात विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुलने टीम इंडियाची कमान हाती घेतली होती. (Photo: Facebook)

2 / 4
केएल राहुल हा आपला आवडता कर्णधार का आहे याचं श्रेयसने दिलेलं कारण ऐकून तुम्हाला हसू येईल. श्रेयस म्हणाला राहुलने त्याच्या नेतृत्वाखाली मला तीन षटके गोलंदाजी करण्याची संधी दिली, जी यापूर्वी कोणत्याही कर्णधाराने दिली नव्हती, त्यामुळे तो माझा आवडता कर्णधार आहे. (Photo: PTI)

3 / 4
आयपीएल 2022 च्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असणार्‍या श्रेयस अय्यरने हा विनोद बाजूला ठेवत खरे कारण सांगितले. क्लबहाऊस अॅपमधील रेड बुल क्रिकेट रूमवर बोलताना अय्यर म्हणाला, “त्याच्या नेतृत्वात खेळण्याचा अनुभव खूप छान होता. तो एक दिग्गज खेळाडू आहे. तो मैदानावर आणि टीम मीटिंगमध्ये ज्या प्रकारचा आत्मविश्वास दाखवतो, प्रत्येक खेळाडूला तो ज्या प्रकारचा पाठिंबा देतो ते कौतुकास्पद आहे. (Photo: AFP)

4 / 4
राहुलने या वर्षी दक्षिण आफ्रिकेत प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. यादरम्यान, एक कसोटी आणि तीनही एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला. अय्यर एकदिवसीय मालिकेतील 3 सामने खेळला. अय्यरने राहुलचे कौतुक केले आणि सांगितले की तो शांत स्वभावाचा आहे आणि मैदानावर निर्णय घेण्याची त्याची क्षमता खूप खास आहे. (फोटो: बीसीसीआय)