PHOTO: IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज, एका दिग्गज कर्णधाराचाही समावेश

| Updated on: Sep 19, 2021 | 8:37 PM

आयपीएल म्हटलं की तुफानी फलंदाजी करणारे आणि नवनवीन रेकॉर्ड्स नावावर करणारे फलंदाज आपल्या डोळ्यासमोर येतात. पण असेही काही रेकॉर्ड्स आहेत, जे कोणत्याच फलंदाजाला नको असतात.

1 / 6
आयपीएलमध्ये फलंदाजानी धमाकेदार खेळी करत अनेक रेकॉर्ड नावावर केले आहेत. पण या सगळ्यात एक असंही रेकॉर्ड आहे. जे कोणत्याच फलंदाजाला आवडत नाही. हे रेकॉर्ड म्हणजे सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचं. या रेकॉर्डमध्ये काही दिग्गज खेळाडूही सामिल आहेत.

2 / 6
या यादीत सर्वात पहिलं नाव आहे, सध्या कोलकाता नाइट राइडर्स संघाकडून  खेळणाऱ्या हरभजन सिंग याचं. हा दिग्गज खेळाडू याआधी चेन्नई आणि मुंबई संघाकडूनही खेळला आहे. तो 163 सामन्यात 90 वेळा क्रिजवर आला आहे.  यामध्ये 13 वेळा तो शून्यावर बाद झाला आहे.

3 / 6
हरभजननंतर नंबर लागतो पार्थिव पटेलचा. पटेल आतापर्यंत चेन्नई, डेक्कन चार्जस, कोची, मुंबई, बंगळुरु आणि हैद्राबाद संघाकडून खेळला आहे. 139 सामन्यातील 137 वेळा क्रिजवर आलेला पटेल 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

4 / 6
सध्या खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या अजिंक्य रहाणेचा नंबरही या यादीत आहे. रहाणे 151 सामन्यात 141 वेळा क्रिजवर आला असून 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

5 / 6
या यादीत चेन्नईचा खेळाडू अंबाती रायडूही सामिल आहे. रायडू 166 सामन्यात 156 वेळा फलंदाजीला आला आहे. यामध्ये 13 वेळा तो खातं न खोलताचं बाद झाला आहे.

6 / 6
या यादीत सर्वात शेवटचं नाव कोणालाही चकीत करणारं आहे. हे नाव म्हणजे आय़पीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा. रोहित 207 सामन्यात 202 वेळा फलंदाजीला येत 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.