
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूज टाईम आऊट झाला.अँजलो एकही बॉल न खेळता माघारी परतला. अँजलो क्रिकेट इतिहासात अशा पद्धतीने आऊट होणारा पहिला फलंदाज ठरला.

अँजलो मैदानात आल्यानंतर हेल्मेट घालत होता. या दरम्यान अँजलोच्या हेल्मेटची स्ट्रीप तुटली. त्यामुळे सामन्यात थोडा वेळ गेला. त्यामुळे बॉलिंग टाकत असलेल्या बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन याने अपील केली. त्यानुसार पंचांनी अँजलोला आयसीसीच्या नियमांनुसार आऊट दिलं.

पंचांनी बाद घोषित केल्यानंतर अँजलोने नाराजी व्यक्त केली. अँजलोला पंचांचा हा निर्णय पटला नाही. तर शाकिबने केलेली अपील नेटकऱ्यांनी आवडली नाही. शाकिब अनुभवी खेळाडू आहे, त्याने असं करायला नको होतं. त्याच्याकडून असं अपेक्षित नाही, असं नेटकरी म्हणत आहेत.

तसेच अँजलो याला चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याचंही म्हटलं जात आहे. तर बांगलादेशने या सामन्यात खिळाडूवृत्तीला काळीमा फासली असंही, क्रिकेट चाहते म्हणत आहे.

दरम्यान अँजलो या सर्व प्रकारानंतर मैदानातून बाहेर पडला. अँजलोने बाउंड्री लाईनच्या बाहेर पडताच हेल्मेट फेकला. अँजलोच्या या संतापामुळे तो आऊट होण्यामागे नक्की चुक कुणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.