
वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 26 व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.

या सामन्यादरम्यान गरमागरमी पाहायला मिळाली. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिका टीमचा मार्को यान्सेन भिडले.

मोहम्मद रिझवान याने मार्को यान्सेन याला पाहून काही तरी म्हटलं. त्यामुळे मार्कोनेही रिझवानला त्याच्या भाषेत उत्तर दिलं.

रिझवान आणि यानसेन दोघेही भिडल्यचां पाहून पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम याने मध्यस्थी केली. दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे काही वेळ वातावरण गरम झालेलं.

दरम्यान पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कपमधील सहावा सामना आहे. दक्षिण आफ्रिकाने 5 पैकी 4 तर पाकिस्तानने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे.