Indian Captainship : काय बोलता! भारतीय संघाने एका वर्षात 6 कर्णधार बदलले, जाणून घ्या कुणाला मिळाली संधी…

टीम इंडियाने एका वर्षात सहा कर्णधार बदलले आहेत. जाणून घ्या...

Shubham Kulkarni | Updated on: Jun 11, 2022 | 3:49 PM
1 / 7
पहिल्यांदाच संघाचं नेतृत्व सांभाळणाऱ्या रिषभ पंतवर आता सर्वांच्या नजरा आहेत.

पहिल्यांदाच संघाचं नेतृत्व सांभाळणाऱ्या रिषभ पंतवर आता सर्वांच्या नजरा आहेत.

2 / 7

केएल राहुलनं गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासाठी तीन एकदिवसीय आणि एका कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केलं होतं.

3 / 7

शिखर धवननं गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं होतं.

4 / 7

अजिंक्य रहाणेनं नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते.

5 / 7

विराट कोहलीनं टी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडले. नंतर कोहलीला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गमवावे लागले.

6 / 7

2021- च्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीनं राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माला T-20 फॉरमॅटचा कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आलं.

7 / 7

रिषभ पंत एका वर्षात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा सहावा कर्णधार आहे. यात विशेष म्हणजे या सर्वात कर्णधारांनी राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी घेतलीय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us