आयपीएल स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सला आनंदाची बातमी, या दिग्गज खेळाडूने केला मोठा कारनामा

| Updated on: Mar 18, 2024 | 10:18 PM

आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत गुजरात टायटन्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधाराच्या हाती यापूर्वी गुजरातची धुरा होती. त्यामुळे या सामन्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. असं असताना गुजरात टायटन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

1 / 6
आयपीएल स्पर्धेचा रंग आता हळूहळू गडद होत चालला आहे. जसजशी ही स्पर्धा जवळ येत चालली आहे. तसतशी या स्पर्धेबाबतची रंगत आणखी चढत चालली आहे. विदेशी खेळाडूंचं संघात येणं सुरु झालं आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचे काही खेळाडू जायबंदी झाले असताना शुबमन गिलचं टेन्शन वाढलं आहे. पण एका दिग्गज खेळाडूच्या कामगिरीने ताकद वाढली आहे.

2 / 6
अफगाणिस्तानचा राशिद खान दुखापतीमुळे  क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे तो क्रिकेट खेळत नव्हता. पण आयपीएलपूर्वी तो तंदुरुस्त होऊन परतला आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळण्यास सज्ज आहे.

3 / 6
अफगाणिस्तान संघ आयर्लंडसोबत टी20 मालिकेतील शेवटचा सामना खेळत आहे. यानंतर अफगाणिस्तानचे खेळाडूही त्या त्या संघात रुजू होतील. असं असताना  अफगाणिस्तानचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या राशिद खानने नवा विक्रम केला आहे.

4 / 6
राशिद खानने श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना बोल्ड करण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावे होता. त्याने 43 बोल्ड केले होते.

5 / 6
आता राशिद खानने गोलंदाजी करताना 45 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुबमन गिल करत असून राशिद खान उपकर्णधार म्हणून दिसणार आहे. आता संघासाठी कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.

6 / 6
गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन.  जखमी/माघार घेतलेले खेळाडू: मोहम्मद शमी, रॉबिन मिन्झ.