
आयपीएल 2023 स्पर्धेत सात जणांनी शतक झळकावलं आहे. हैदराबादच्या हेनरिक क्लासेननं सातवं आणि वैयक्तिक पहिलं शतक झळकावलं.

हेनरिक क्लासेनने 51 चेंडूत 104 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे.

सनराईजर्स हैदराबाद संघाकडून हे चौथ शतक आहे. डेविड वॉर्नरने 2, जॉनी बेयरस्टोने 1 आणि आता हेनरिक क्लासेननं 1 शतक झळकावलं आहे.

डेविड वॉर्नरने आयपीएल 2017 मध्ये कोलकात्याविरुद्ध 126 धावा, जॉनी बेयरस्टोने 2019 मध्ये आरसीबी विरुद्ध 114, डेविड वॉर्नरने 2019 मध्ये आरसीबी विरुद्ध 100* आणि हेनरिक क्लासेननं 2023 मध्ये आरसीबी विरुद्ध 104 धाव केल्या आहेत.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी