1..2..3.. 100! ऋषभ पंतने सर्वात वेगवान 100 षटकार मारले, इतक्या कमी चेंडूत नोंदवला विश्वविक्रम

India vs Sri Lanka, Galle Test: भारताच्या दुसर्‍या डावात एकीकडे फलंदाज फेल गेले, तिथे ऋषभ पंतने कमाल केली. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडिया सुस्थितीत आली. इतकंच काय तर कसोटीत 100 वेगवान षटकार मारण्याचा विक्रमही नोंदवला आहे. चला जाणून घेऊयात पंतने कोणाचा विक्रम मोडला ते..

| Updated on: Aug 18, 2026 | 2:58 PM
1 / 5
ऋषभ पंतने 69 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत 66 धावांची खेळी केली. या खेळीसह ऋषभ पंतने गॉल कसोटीत ऐतिहासिक नोंद केली आहे. त्याने हा विक्रम दोन पद्धतीने नोंदवला आहे. पहिला म्हणजे 100 कसोटी षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज आणि दुसरं म्हणजे सर्वात वेगाने 100 षटकार मारणारा फलंदाज...(Photo: BCCI Twitter)

2 / 5
कसोटीत सर्वात वेगाने 100 षटकार मारण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर नोंदवला गेला हे. त्याने खूप कमी डावा नाही तर कमी चेंडूत हा कारनामा केला आहे. त्याे 100 षटकार मारण्यासाठी 89 डाव खेळले आणि 4918 चेंडूंचा सामना केला. (Photo: BCCI Twitter)

3 / 5
कसोटीत सर्वात वेगाने 100 षटकार मारणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा एडम गिलख्रिस्टचा विक्रम त्याने मोडीत काढला. गिलख्रिस्टाने 132 डावात आणि 6578 चेंडूत 100 कसोटी षटकार मारले होते.(Photo: BCCI Twitter)

4 / 5
ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. त्याने 91 षटकार मारले होते. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
ऋषभ पंतने गॉल कसोटीतील दुसर्‍या डावात षटकार मारून अर्धशतक साजरं केलं. त्याने ज्या षटकारावर अर्धशतक पूर्ण केलं त्या षटकारावरच त्याने कसोटीतील 100व्या षटकाराची नोंद केली हे विशेष... (Photo: BCCI Twitter)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us