
भारताने दुसरा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला. तर केपटाऊनमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला आहे. या विजयासह मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं. पहिला मालिका गमवल्याने टीम इंडियावर दडपण आलं होतं.

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात कर्णधार रोहित शर्माला यश आलं आहे. पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी जिंकण्याचा दबाव होता. त्यात खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी होती. भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

भारतीय संघ 1993 पासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. मात्र आजपर्यंत दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र, केपटाऊन कसोटी जिंकून टीम इंडियाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. अशी कामगिरी 13 वर्षांनंतर घडली आहे.

मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 2010-2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकल्याने टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आता भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मायदेशात भारत इंग्लंडशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार