IND vs SL: दोन सामन्यात 332 धावा करणाऱ्या खेळाडूमुळे भारताला संजीवनी, श्रीलंकेचं काही खरं नाही!

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघावर दुखापतीचं सावट आहे. असं असताना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे.

| Updated on: Aug 05, 2026 | 5:42 PM
1 / 5
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन या मालिकेसाठी फिट आहे. त्याने फलंदाजी सरावही सुरू केला आहे. रिपोर्टनुसार, लवकरच टीम इंडियात सामील होईल. (Photo: PTI)

2 / 5
साई सुदर्शन सध्या बंगळुरूत आहे. सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आपलं फिटनेस सुधारण्यासाठी काम करत आहे. आता त्याने फलंदाजीला सुरूवात केली आहे. (Photo: PTI)

3 / 5
साई सुदर्शन 8 ऑगस्टला श्रीलंकेत जाण्याची शक्यता आहे. सध्या श्रीलंकेत लोकल संघाविरुद्ध सराव सामन्यात भाग घेणार नाही. पण संघासोबत असणार आहे. भारताचा सराव सामना 7 ऑगस्टला सुरू होईल. (Photo: PTI)

4 / 5
साई सुदर्शन फिट होणं टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. कारण साई सुदर्शन सध्या फॉर्मात आहे. त्याने इंडिया ए कडून श्रीलंकेत खेळताना बऱ्यापैकी धावा केल्या होत्या. त्यामुळे तिथल्या खेळपट्ट्यांचा त्याला अंदाज आहे. (Photo: PTI)

5 / 5
साई सुदर्शनने इंडिया ए  साठी खेळताना जबरदस्त कामगिरी केली होती. सुदर्शनने दोन्ही सामना गॉलमध्ये खेळले होते. त्या दोन्ही सामन्यात शतक ठोकलं होतं. दोन्ही सामन्यात नाबाद 332 धावा केल्या होत्या. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us