श्रीलंका विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर शुबमन गिल खेळणार टी20 लीग! टीम इंडियात स्थान मिळणार?

शुबमन गिल याच्याकडे कसोटी आणि वनडे संघाचं नेतृत्व आहे. पण टी20 फॉर्मेटमध्ये त्याची जागा काही होताना दिसत नाही. त्यामुळे एका संधीच्या शोधात आहे. असं असताना कसोटी मालिकेनंतर शुबमन गिल एका नव्या टी20 लीग स्पर्धेत खेलण्याची शक्यता आहे.

| Updated on: Aug 03, 2026 | 6:29 PM
1 / 5
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरू आहे. शुबमन गिल या मालिकेनंतर नव्या टी20 लीग स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. (PC-PTI)

2 / 5
शुबमन गिलने भारतासाठी आतापर्यंत 36 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून त्याने 28.03 च्या सरासरीने एकूण 869 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 138.60 इतका राहिला आहे. (PC-PTI)

3 / 5
शुबमन गिलने 2 ऑगस्टला शेर ए पंजाब टी20 लीग स्पर्धेच्या लाँचिंग कार्यक्रमात भाग घेतला होता. तिथे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहही होती. अर्शदीप सिंग या टी20 स्पर्धेत खेळणार असल्याचं बोललं जात आहे. (PC-PTI)

4 / 5
शुबमन गिल व्यतिरिक्त अभिषेक शर्माचं नावंही या लीगसाठी चर्चेत आहे. त्यामुळे या लीगमध्ये खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. पंजाब क्रिकेट असोसिएशनने नव्याने टी20 लीग स्पर्धा सुरू केली आहे. राज्यातील नवोदीत खेळाडूंना व्यासपीठ मिळावं हा हेतू आहे. (PC-PTI)

5 / 5
शुबमन गिलला भारतीय टी20 संघात स्थान मिळणं कठीण झालं आहे. सलग 15 टी20 सामन्यात फेल गेल्यानंतर त्याला संघातून बाहेर काढलं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतून वगळण्यात आलं. आता शेर ए पंजाब टी20 लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करून पुन्हा संघात स्थान मिळवू शकतो. (PC-PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us