
ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला आहे. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयसाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं होतं. डेविड मिलरने शतकी खेळी करत झुंज दिली. त्यामुळे 200 पार धावसंख्या उभारण्यास मदत झाली.

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. अफ्रिकेने 14 षटकात 4 गडी गमवून 44 धावा केल्या होत्या. विशेषत: पॉवरप्लेमध्ये फक्त 18 धावा केल्या.

पहिल्या दहा षटकात 2 गडी गमवून 18 धावा करणाऱ्या दक्षिण अफ्रिकेची पॉवर प्लेमधील दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. वर्ल्डकप इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी धावा करणाऱ्या संघावर एक नजर टाकुयात..

दक्षिण अफ्रिकेपूर्वी श्रीलंकन संघाने पॉवर प्लेमध्ये 6 गडी गमवून 14 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 300 हून अधिक धावांनी जिंकला होता.

2015 च्या विश्वचषकात पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध 2 गडी गमावून 14 धावा केल्या होत्या.

2011 च्या विश्वचषकातही कॅनडाने झिम्बाब्वेविरुद्ध 3 गडी गमावून 14 धावा केल्या होत्या.

2011 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध 3 विकेट गमावून 18 धावा केल्या होत्या.

2023 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2 विकेट गमावून 18 धावा केल्या आहेत.