
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जेपी डुमिनी याचा घटस्फोट झाला आहे. डुमिनी याने सोमवारी सोशल मीडियावरुन त्याची पत्नी सू डुमिनीपासून विभक्त झाल्याचं जाहीर केलं. दोघेही 2011 साली विवाहबद्ध झाले होते. (Photo Credit : Icc X Account)

डुमिनी आयपीएलमधील स्टार खेळाडूंपैकी एक राहिलाय. डुमिनीने आयपीएलमध्ये दिल्ली आणि मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र डुमिनीला 2018 नंतर पुन्हा खेळण्याची संधी मिळाली नाही. (Photo Credit : Icc X Account)

डुमिनी आणि त्याची पत्नी सू या दोघांमध्ये सर्व काही चांगलं सुरु होतं. मात्र स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, दोघांमध्ये 2024 पासून खटकायला सुरुवात झाल्याचं म्हटलंय. (Photo Credit : jpduminy21 X Account)

डुमिनी आणि त्याची पत्नी या दोघांमध्ये गेल्या काही वेळापासून फार काही आलबेल नव्हतं. त्यामुळे दोघांनी लग्नाच्या बंधनातून मुक्त होण्याचं ठरवलं. मात्र दोघे विभक्त का झालेत? यामागील मुख्य कारण समजू शकलेलं नाही. (Photo Credit : jpduminy21 X Account)

डुमिनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत घटस्फोटाबाबत माहिती दिलीय. तसेच डुमिनीने त्याच्या अभिव्यक्तीबाबत काळजी घ्यावी, असं आवाहन इतरांना केलंय. तसेच डुमिनीने सर्वांचे आभारही मानले. (Photo Credit : jpduminy21 X Account)

डुमिनीने हैदराबाद, दिल्ली आणि, डेक्कन चार्जर्स आणि मुंबईचं प्रतिनिधित्व केलंय. डुमिनीने आयपीएलमध्ये 83 सामन्यांमध्ये 2 हजार 29 धावा केल्यात. तसेच 23 विकेट्सही घेतल्या आहेत. (Photo Credit : jpduminy21 X Account)