Rohit Sharma On Dhawal Kulkarni | हिटमॅन रोहित शर्मा याची धवलसाठी मराठीत खास पोस्ट, म्हणाला…..

Rohit Sharma Insta Story On Dhawal Kulkarni | रोहित शर्मा याने आपला खास भिडू धवल कुलकर्णी याच्यासाठी मराठीत इंस्टा स्टोरी पोस्ट केली आहे. रोहितने या इंस्टा स्टोरीमुळे अनेक चाहत्यांची मनं जिंकली.

| Updated on: Mar 14, 2024 | 4:01 PM
1 / 7
मुंबईने विदर्भावर पाचव्या दिवशी 169 धावांनी मात करत रणजी ट्रॉफी जिंकली. विदर्भाला 538 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना ऑलआऊट 368 धावाच  करता आल्या.

2 / 7
मुंबईचा अनुभवी गोलंदाज आणि अखेरचा सामना खेळत असलेल्या धवल कुलकर्णी याने विदर्भाची 10 वी आणि विजयी विकेट घेतली.  धवलने अशाप्रकारे आपल्या कारकीर्दीचा अविस्मरणीय शेवट केला.

3 / 7
धवलने या  सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. धवलला सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं. धवलने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली.

4 / 7
धवलला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच क्रिकेट चाहत्यांनी धवलला साश्रू नयनांनी निरोप दिला. धवललाही यावेळेस भावना अनावर झाल्या

5 / 7
धवल कुलकर्णी याच्यासाठी त्याचा गेल्या अनेक वर्षांचा सहकारी आणि टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने इंस्टाग्रामवर मराठीत स्टोरी शेअर केली आहे.

6 / 7
रोहितने आपल्या इंस्टा स्टोरीत धवलचा फोटो पोस्ट केलाय. तसेच रोहितने धवलच्या या फोटोला 'मुंबईचा योद्धा' असं कॅप्शन दिलंय. रोहितची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

7 / 7
दरम्यान मुंबईने 6 वर्षानंतर रणजी ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे. तसेच मुंबईची रणजी ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण 42 वी वेळ ठरली.