AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market: डोनाल्ड ट्रम्प यांचा एक सिग्नल… बाजाराचा कॅब्रे डान्स, शेअर बाजारात आले पुन्हा तुफान

Share Market Boom: इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाविषयी एक मोठी अपडेट समोर येताच भारतीय शेअर बाजाराला आनंदाचे भरते आले. कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली.या सर्व आनंदवार्ता येऊन धडकताच शेअर बाजाराने मोठी झेप घेतली. काय आहे अपडेट?

Stock Market: डोनाल्ड ट्रम्प यांचा एक सिग्नल... बाजाराचा कॅब्रे डान्स, शेअर बाजारात आले पुन्हा तुफान
स्टॉक मार्केट, डोनाल्ड ट्रम्पImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 10, 2026 | 11:05 AM
Share

Stock Market Hike: सोमवारी, एक दिवसापूर्वी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. तर मंगळवारी सकाळी बाजाराने आनंदाची तुतारी वाजवली. भारतीय शेअर बाजार मजबूत झाला. शेअर बाजार सुरू होताच दमदार खरेदी दिसून आली. BSE Sensex गेल्या बंद 77,566.16 च्या तुलनेत 78,375.73 अंकावर आज उघडला. म्हणजे सुरुवातीलाच शेअर बाजाराने जवळपास 809.57 अकांची तेजी दिसून आली. तर Nifty 50 पण मोठ्या धडाक्यात उघडला. निफ्टी सोमवारी 24,028.05 अंकावर बंद झाला होता. आज निफ्टी 24,280.80 अंकावर पोहचला. म्हणजे जवळपास 252.75 अंकाची वाढ दिसून आली.

आशिया बाजारात पुन्हा तेजीचे सत्र

कच्चे तेलाच्या किंमतीत मोठा चढउतार दिसून आला. पश्चिम आशियातील ताणतणावात मंगळवारी आशियातील शेअर बाजारात मजबुती दिसून आली. Nikkei 225 जवळपास 1,670.36 अंक (3.17%) वधारून 54,399.08 अंकावर पोहचला. तर Hang Seng Index 432.50 अंक (1.70%) च्या तेजीसह 25,840.97 अंकावर आला. याशिवाय दक्षिण कोरियातील KOSPI मध्ये मोठी मजबुती दिसली. हा शेअर बाजार 256.46 अंकांनी (4.88%) वधारून 5,508.33 अंकांवर पोहचला. आशिया बाजारात पुन्हा तेजीचे सत्र दिसल्याने गुंतवणूकदार पुन्हा खरेदी करत असल्याचे दिसते. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

10 मार्च रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. एका दिवसापूर्वी किंमती तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहचल्या होत्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य-पूर्वेतील युद्ध लवकरच संपुष्टात येण्याचे संकेत दिले. त्यानंतर कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण दिसली. तर कच्चा तेलाच्या पुरवठ्यातील अडथळे सुद्धा कमी होण्याची दाट शक्यता आहे. कच्चा तेलाचा पुरवठा लवकरच सुरळीत होण्याची शक्यता आहे. Brent Crude च्या किंमतीत 6.51 डॉलर (6.6%) घसरण झाली, आता हा भाव 92.45 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. तर West Texas Intermediate (WTI) कच्चे तेल 6.12 डॉलर (6.5%) घसरुन 88.65 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. भारतातील तेलाच्या किंमतीतही मोठी घसरण झाल्याचे संकेत मिळत आहे. Multi Commodity Exchange (MCX) वायदे बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत जवळपास 6% घसरण होऊन ते 8,261 रुपये प्रति बॅरलवर व्यापार करत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्ध समाप्तीचे संकेत

इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाचे ढग गडद होत असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे संकेत दिले आहेत. हे युद्ध लवकरच संपणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यांनी याविषयीची कोणतीही वेळ मर्यादा मात्र जाहीर केली नाही. सध्या अडचणी सोडवल्या जात आहेत. तर युद्ध ग्रस्त भागात युद्ध थांबवण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत त्यांनी दिले. जागतिक तेल पुरवठा साखळीवर कोणी दबाव आणून जगाला वेठीस धरणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही, अशा शक्तींना वेळीच धडा शिकवण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला. होमूर्झ समुद्रधुनीतील पुरवठ्याबाबत इराणला हा इशारा मानल्या जात आहे.

Follow Us
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय