Cheteshwar Pujara : टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराचे खास रेकॉर्ड, एकदा पाहाच

Cheteshwar Pujara Red Ball Cricket Records: चेतेश्वर पुजारा याने भारताचं 103 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. पुजाराने या दरम्यान 43.60 च्या सरासरीने 7 हजार 195 धावा केल्या. पुजाराने कसोटी कारकीर्दीत केलेल्या खास कामगिरीबाबत जाणून घ्या.

| Updated on: Aug 24, 2025 | 10:54 PM
1 / 5
चेतेश्वर पुजाराने 24 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. पुजाराच्या निवृत्तीनिमित्ताने त्याने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या काही विक्रमांबाबत जाणून घेऊयात. पुजारा भारतासाठी एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा फलंदाज आहे. पुजाराने 16 मार्च 2017 रोजी ही कामगिरी केली होती. पुजारा रांचीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 672 मिनिटं खेळला. या दरम्यान पुजाराने 525 चेंडूचा सामना केला. (Photo Credit : Icc X Account)

2 / 5
पुजाराने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. पुजाराने फर्स्ट क्लास क्रिकेट कारकीर्दीत एकूण 18 द्विशतकं झळकावली. पुजारा सर्वाधिक द्विशतकं करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी दिग्गज सर डॉन ब्रॅडमॅन विराजमान आहेत. (Photo Credit : Icc X Account)

3 / 5
पुजारा भारताच्या विजयात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. पुजाराने 36 विजयात 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या यादीत दिग्गज सचिन तेंडुलकर पहिल्या तर राहुल द्रविड दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. (Photo Credit : Icc X Account)

4 / 5
पुजारा गेल्या 40 वर्षांत एका कसोटी सामन्यातील सर्वाधिक वेळ टिकून राहून बॅटिंग करणारा एकमेव तर एकूण दुसरा भारतीय फलंदाज आहे. पुजाराने 2017 साली श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.  क्रिकेट विश्वात आतापर्यंत एकूण 13 फलंदाजांनाच ही कामगिरी करता आली आहे. (Photo Credit : Icc X Account)

5 / 5
चेतेश्वर पुजारा खेळाडू म्हणून सेना देशात (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया)  सर्वाधिक 11 कसोटी सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. तर अजिंक्य रहाणे, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि केएल राहुल हे 5 खेळाडू सेना देशात प्रत्येकी 10 वेळा विजयी संघातील भाग होते. (Photo Credit : Icc X Account)