
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर दीपक चाहरची पत्नी जया भारद्वाज सोशल मीडियावर खूप Active असते. तो फॅन्ससाठी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. जया भारद्वाज सौंदर्यामध्ये कुठल्याही हिरॉईनपेक्षा कमी नाहीय.

अलीकडेच जया भारद्वाजसोबत फसवणूक झाल्याच एक प्रकरण समोर आलं होतं. तिने सोशल मीडिया पोस्टमधून याबद्दल माहिती दिली. जयाने कोणाला तरी पैसे उधार दिले होते. तिने ते पैसे परत मागितले, त्यावेळी समोरच्या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यावेळी जयाच्या सासऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

मूळचा आग्र्याचा असलेल्या दीपक चाहरने आयपीएल दरम्यान प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या स्टेडियममध्ये जयाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झालेला.

दीपक आणि जयाच मागच्यावर्षी जून महिन्यात लग्न झालं. दीपकने स्टेडियममध्ये गुडघ्यावर बसून जयाला प्रपोज केलं होतं. त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. विधी परंपरेनुसार, आग्र्यामध्ये दोघांच लग्न झालं.

दीपक चाहर आणि जया भारद्वाज 'द कपिल शर्मा शो' मध्ये लवकरच दिसतील. या शो च शूटिंग पूर्ण झालीय. 14 फेब्रुवारीच्या आधी हा शो प्रसारीत होईल. सध्या सोशल मीडियावर जया भारद्वाजच्या काही बोल्ड फोटोंची चर्चा आहे.