
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका गुरुवारपासून सुरू होणार आहे. टीम इंडियाची वनडे वर्ल्डकपची तयारीही या मालिकेपासून सुरू होणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघ फक्त दोन वनडे मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

या मालिकांदरम्यान टीम इंडिया आशिया कपही खेळणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला तर ते एकूण 5 एकदिवसीय सामने खेळेल. म्हणजेच विश्वचषकापूर्वी टीम इंडिया 11 एकदिवसीय सामने खेळण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आगामी आशिया कपमध्ये संधी दिली जाणार आहे. तसेच आशिया कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची वनडे विश्वचषकासाठी निवड होणार हे निश्चित आहे.
