
टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू पीयूष चावला याने 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पीयूषने आयपीएलमध्ये 4 संघांचं प्रतिनिधित्व केलं. पीयूषने पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. (Photo Credit : Gurpreet Singh/ HT via Getty Images)

पीयुष चावला याने 2014 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळायला सुरुवात केली. केकेआर याच हंगामात चॅम्पियन झाली. पीयूषने या हंगामातील 11 सामन्यांमध्ये एकूण 14 विकेट्स घेत केकेआरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. (Photo Credit-Subhendu Ghosh/HT via Getty Images)

पीयूष चावला याने IPL 2024 मध्य मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. तर पीयूष 18 व्या मोसमात (IPL 2025) अनसोल्ड राहिला. पीयूषने आयपीएल कारकीर्दीतील 192 सामन्यांमध्ये 192 विकेट्स घेतल्या आहे. (Photo Credit : Screenshot/Instagram)

टीम इंडियाच्या या माजी फिरकीपटूने आयपीएल स्पर्धेतून एकूण 52 कोटी 27 लाख रुपयांची कमाई केली आहे. पीयूष चावला याचं एकूण नेटवर्थ हे जवळपास 65 ते 70 कोटी इतकं आहे. (Photo Credit-Screenshot/Instagram)

पीयूष चावला टीम इंडियाच्या 2 वर्ल्ड कप विजयी संघात होता. टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात 2007 टी 20 वर्ल्ड कप तर 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. पीयूष चावला या दोन्ही संघाचा भाग होता. (Photo Credit - Screenshot/Instagram)