
आयसीसी वनडे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणाही केलीय. टीम इंडिया पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.त्याआधी टीम इंडियाचे असे 3 दुर्देवी खेळाडू आहेत, ज्यांना चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्येही संधी देण्यात आली नाही.

टीम इंडियाचा 'गब्बर' शिखर धवन याची वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली नाही.धवनला एशियन गेम्समध्ये कर्णधार करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. कॅप्टन्सी सोडा त्याला टीममध्येही घेतलं नाही.

धवनने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतकांच्या मदतीने 6 हजार 793 धावा केल्या आहेत. तसेच धवनने 68 टी 20 आणि 34 कसोटी सामन्यांमध्येही टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय.

युझवेंद्र चहल याला ना वर्ल्ड कप टीमध्ये संधी दिलीय ना एशियन गेम्स 2023 मध्ये. वर्ल्ड कप टीममध्ये कुलदीप यादव याचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे चहलला संधी मिळाली नाही.

चहलने 72 एकदिवसीय आणि 80 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. चहलने वनडेत 12 आणि टी 20 मध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार याने आपल्या स्विंगच्या जोरावर भल्या भल्यांच्या दांड्या गुल केल्या आहेत. मात्र भुवनेश्वरचा गेल्या काही मालिकांसाठीही विचार करण्यात आला नाही.

भुवनेश्वर कुमार 87 टी 20, 121 एकदिवसीय आणि 21 कसोटी सामने खेळला आहे. भुवनेश्वरने यामध्ये अनुक्रमे 90, 141 आणि 63 विकेट्स घेतल्या आहेत.