
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आतापर्यंत आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक सामन्यांमध्ये विजयी केलं आहे. विराटने टी 20i वर्ल्ड कप 2024 नंतर या छोट्या प्रकारातून निवृत्ती घेतली. विराट श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याचीही कायम विराटसह तुलना होत असते. मात्र बाबर विराटपेक्षा फार ज्युनिअर आहे. विराटने 2008 साली तर बाबरने 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

विराट श्रेष्ठ की बाबर श्रेष्ठ, अशी चर्चा कायम पाहायला मिळते. मात्र कमाईबाबत दोघांपैकी कोण सरस आहे? दोघांची कमाई किती आहे? हे जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली याचं नेटवर्थ हे 100 मिलयन डॉलरपेक्षा अधिक आहे. विराटचं नेटवर्थ हे एकूण 127 मिलियन डॉलर अर्थात 1 हजार 66 कोटी भारतीय रुपये इतकं आहे.

बाबर आझम विराटच्या आसपासही नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबरचं नेटवर्थ हे 41 कोटी इतकं आहे.