Team India : रोहित शर्मा विराटचा तो रेकॉर्ड ब्रेक करण्यात अपयशी, धोनीही पिछाडीवर

IND vs BAN Test Series: टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. रोहितला या मालिकेत विराटचा रेकॉर्ड ब्रेक करत इतिहास रचण्याची संधी आहे.

| Updated on: Sep 09, 2024 | 11:13 PM
1 / 6
टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा कसोटीत तर सूर्यकुमार यादव टी 20i मालिकेत नेतृत्व करणार आहे. सूर्या आणि रोहितआधी विराट कोहलीने तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय. रोहितने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.  मात्र  रोहितला विराटचा एक रेकॉर्ड ब्रेक करता आलेला नाही.

2 / 6

टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहे. विराट 2021 साली कर्णधारपदावरुन पायउतार झाला होता.

3 / 6

टीम इंडियाने विराटच्या नेतृत्वात 2017 आणि 2019 साली सर्वाधिक सामने जिंकले होते. विराटच्या कॅप्टन्सीत या दोन्ही वर्षात भारताने प्रत्येकी 31-31 सामने जिंकले होते. विराटने यासह मोहम्मद अझहरुद्दीनला मागे टाकलं होतं.

4 / 6

मात्र रोहित शर्मा याला विराटचा रेकॉर्ड ब्रेक करता आलेला नाही. रोहितच्या नेतृत्वात भारताने 2022 साली 28 तर 2023 मध्ये 24 सामन्यात विजय नोंदवला होता.

5 / 6

विराटचा रेकॉर्ड ब्रेक करणं कोणत्याही कर्णधारासाठी सहज सोपं आणि शक्य असं नाही. त्याने धोनलाही याबाबतीत मागे टाकलंय.

6 / 6

दरम्यान टीम इंडिया-बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा चेन्नई तर दुसरा सामना कानपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us