IPL 2023 स्पर्धेतील शतकवीर! वेंकटेश अय्यर आणि प्रभसिमरन सिंहसह कोण कोण आहेत यादीत? वाचा

प्रभासिमरन सिंह हा या आयपीएल 16 मोसमात शतक करणारा दुसरा अनकॅप्ड आणि एकूण 5 वा फलंदाज ठरलाय. या हंगामात प्रभासिमरन याच्याआधी हॅरी ब्रूक, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल (अनकॅप्ड) आणि सूर्यकुमार यादव यांनी शतक ठोकलं आहे. अनकॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर न खेळलेला खेळाडू.

| Updated on: May 13, 2023 | 10:16 PM
1 / 5
 दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरन सिंह यांनी 65 चेंडूत 103 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 10 चौकरांचा समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरन सिंह यांनी 65 चेंडूत 103 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 10 चौकरांचा समावेश आहे.

2 / 5

केकेआरसाठी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या वेंकटेश अय्यरने 49 चेंडूत शतक ठोकलं. वेंकटेश अय्यरचं हे पहिलं शतक आहे. तसेच आयपीएल 2023 स्पर्धेत शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज आहे.

3 / 5

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वी जयस्वालने शतक ठोकलं. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. जयस्वालने 62 चेंडूत 8 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीनं 124 धावांची शतकी खेळी साकारली.

4 / 5

सूर्यकुमार यादवने गुजरात विरुद्धच्या समन्यात शतक ठोकलं. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. या खेळईत 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे.

5 / 5

सनराईजर्स हैदराबादकडून खेळताना हॅरी ब्रुकने 55 चेंडूत नाबाबत 100 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us